मुंबई: बजाज ऑटो लिमिटेडने नवीन पल्सर एन १२५ नुकतीच लाँच केली आहे. जी नवीन इंजिन आणि चेसिस, तसेच नवीन स्टाइल आणि लेटेस्ट फीचर्सने सुसज्ज आहे. ही बाइक स्पोर्टी असून, त्याचे बॉडीवर्क अँगुलर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ती मस्क्युलर लुक देते. मात्र, याचे वजन कमी ठेवण्यात आले आहे. यात १२४.५८. सीसी सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे, जे पूर्णपणे नवीन आहे.
एका लीटर पेट्रोलवर हायवेवर ६० किलोमीटर आणि शहरात ५५ किलोमीटरपर्यंत धाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याला आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टीम देण्यात आली आहे, या पल्सरमध्ये १७ इंच टायर आणि १९८ मिमी ग्राउंड क्लिअरन्स आहे. स्प्लिट सीट डिझाइन, हँडलबार माउंट केलेले पॉलीगोनल रीअर व्यू मिरर, एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प तसेच हॅलोजन इंडिकेटर, रीअर टीअर हगर आणि शॉर्ट टेल सेक्शन त्याचा लुक आणि एकूणच स्पोर्टी आणि आकर्षक बनवतो.


