मुंबई: पॉवर बटन बंद पडले आहे? तर पुढील ट्रिक वापरून तुम्ही फोनची स्क्रीन ऑन करू शकता. चला जाणून घेऊया या समस्येवरील जालीम उपाय. हल्ली स्मार्टफोनशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. एकेकाळी संवादाचे साधन असलेल्या स्मार्टफोन्सशिवाय आयुष्यातील अनेक व्यवहार ठप्प पडू शकतात. त्यामुळे चोवीस तास स्मार्टफोन आपल्या हातात असतो, तरीही यातील अनेक फीचर आपल्याला माहीत नसतात. अशाच एका सिक्रेट अँड्रॉइड फीचरची माहिती आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून देणार आहोत. स्मार्टफोनवर एखादे काम करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला फोन ऑन करावा लागतो. फोन अनलॉक करण्यासाठी अनेक जण पावर बटन प्रेस करतात, त्यामुळे स्क्रीन ऑन होते आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फोन लॉक पिन व पॅटर्नच्या माध्यमातून ओपन करता.
परंतु जर एखाद्या दिवशी स्मार्टफोनचं पावर बटनच बिघडलं, तर काय होईल ? याचा विचार केलाय का कधी? तेव्हा तुम्ही फोन अनलॉक कसा कराल. फोन अनलॉक करण्यासाठी पिन व पॅटर्न टाकावा लागतो, परंतु जर स्क्रीन ऑनच झाली नाही, तर तुम्ही ना पिन टाकू शकाल, ना पॅटर्न, पावर बटनव्यतिरिक्त देखील स्क्रीन ऑन करण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑन कराव्या लागतील. बहुतांश लोकांना या सिक्रेट सेटिंगची माहिती नसते, परंतु आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
पावर बटनविना स्क्रीन ऑन कशी करायची:
- सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा.
- त्यानंतर लॉक स्क्रीन & वॉलपेपरच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- इथे स्मार्ट स्क्रीन ऑन/ऑफ ऑप्शनवर जा.
- त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, ज्यात तुम्हाला डबल टॅप यू टर्न ऑफ ऑप्शनवर क्लिक करा.
- या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या फोनमध्ये एक नवीन फीचर ऑन होईल. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही पावर बटनविना देखील स्मार्टफोन स्क्रीन ऑन करू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर डबल टॅप करावे लागेल. म्हणजे तुमच्या फोनची स्क्रीन ऑन होईल आणि तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी पिन टाकू शकाल. काही फोन्समध्ये लिफ्ट टू वेक अप हा पर्याय असतो, तोदेखील उपयुक्त ठरतो. ज्यात फोन उचलल्यावर स्क्रीन आपोआप ऑन होते आणि लॉक स्क्रीन समोर येते. महत्त्वाची बाब म्हणजे हे पर्याय पॉवर बटन बंद होण्यापूर्वी अॅक्टिव्हेट करावे लागतात म्हणजे ऐनवेळी कामी येतात.


