महाराष्ट्र जागरण डेस्क: तमालपत्राचा वापर आपण निव्वळ आपल्या अन्नातच नव्हे तर आपली त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी देखील करू शकतो. कसे काय, तर जाणून घेऊया तमालपत्राने आपले सौंदर्य कसे वाढवावे ?
चेहऱ्यावर डाग, पुळ्या, पुरळ, मुरुम असल्यास तमालपत्र खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचा लेप किंवा तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि डाग नाहीसे होतात.
तमालपत्राचं पाणी सूर्याच्या किरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेला देखील बरे करण्यास मदत करतं आणि त्वचेचा रंग देखील एक सारखा ठेवण्यास मदत करतं.
केसांना कोमल आणि चमकदार ठेवण्यास तमालपत्राचा वापर फायदेशीर आणि प्रभावी आहे. आपली इच्छा असल्यास याला तेलात घालून तेल केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा याच्या पाण्याने केस धुऊ शकता.
तमालपत्राचा लेप बनवून केसात लावल्याने कोंडा नाहीसा होतो. या लेपाला दह्यात मिसळून लावू शकता, जेणेकरून डोक्याची त्वचा ओलसर राहाते आणि तिला पोषण देखील मिळेल.
तमालपत्र कोरडे केल्यावर आणि त्याच्या भुकटीला मंजनप्रमाणे वापरल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात. आठवड्यातून एकदा हा करून पाहा.


