महाराष्ट्र जागरण डेस्क: दागिने बायकांना फार आवडतात. आपल्या प्रत्येक ड्रेससोबत घातल्या जाणाऱ्या दागिन्यांची बायका काळजी घेतात, दागिन्यात फक्त सोने, चांदी, हिरे, असतात, असे नाही तर आक्सिडाइझ केलेले दागिनेदेखील खूप आकर्षक वाटतात. बायका, मुली अशातील दागिनेदेखील अत्यंत आवडीने घालतात.
आता प्रश्न आहे की, आपण आपल्या एवढ्या आवडीच्या वस्तूची काळजी कशी घेता? कधी याचा विचार केला आहे का? जर आपण दागिने व्यवस्थितरीत्या ठेवले नाहीत तर ते वेळेनुसार काळे पडतात आणि फिकट होऊ लागतात. दागिन्यांची चकाकी तशीच राहावी, त्यासाठी आपल्याला या काही टिप्सचे अनुसरण करणे आवश्यक आहे. दागिन्यांची चकाकी तशीच ठेवायची असल्यास, क्लोरीनच्या पाण्यापासून याला दूर ठेवावे. जर आपण स्वीमिंग पुलात जात असाल किंवा घरचे काम जसे की भांडी घासणे, कपडे पुणे यासारखे काम अंगठी घालून करत असाल, तर ती हळू हळू काळी पडते. तसेच जर आपण ऑक्सिडाइझ केलेले दागिने घातलेले असतील तर क्लोरीनचे पाणी हानीकारक ठरू शकते. म्हणून याचा सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या. जेणे करून याची चमक नयी सारखी बनून राहील.
आपले दागिने व्यवस्थित ठेवायचे असल्यास, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. कारण धूळ-माती, जिवाणु, प्रदूषणामुळे ते काळी पडतात. म्हणून दागिन्यांची आठवड्यातून स्वच्छता करावी. आपली इच्छा असल्यास याला कोमट पाण्यात साबणाचा घोळ बनवून या घोळाने स्वच्छ करू शकता. याव्यतिरिक्त मिठाचे टूथपेस्ट देखील आपण लावू शकता. पण लक्षात असू द्या की, हे दागिने हळुवार हाताने स्वच्छ करायचे असतात.
नेहमी मेकअप आधी करा, नंतर दागिने घाला. बऱ्याच बायकांची सवय असते की, दररोज जे दागिने घालतात, ते घालूनच मेकअप करतात असे केल्यास त्यांच्यावर हळूहळू मेकअप जमू लागतो आणि दागिन्यांची चकाकी कमी होऊ लागते. म्हणून हे लक्षात ठेवावे की मेकअप करताना दागिने घालू नयेत, तर दागिने नंतर घालावेत.
आपल्याला दागिने काळे होण्यापासून वाचवायचे असल्यास त्यांना व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवावे की, दागिने कापसात गुंडाळून वेगवेगळ्या डब्यात ठेवावेत, असे केल्यास मॉइश्चरायझर आणि हवा दागिन्यात जाणार नाही. प्रत्येक दागिना वेगळा ठेवला तर ते अधिक उपयुक्त ठरते.


