Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ATS Raid At Kondhava: कोंढव्यात मध्यरात्री ATS चे सर्च ऑपरेशन; संशयितांची चौकशी सुरू

ATS Raid At Kondhava: कोंढव्यात मध्यरात्री ATS चे सर्च ऑपरेशन; संशयितांची चौकशी सुरू

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात मध्यरात्री एटीएस (अँटी टेररिस्ट स्क्वॉड)ने व्यापक शोधमोहीम राबवली. पुणे पोलिसांच्या सहकार्याने एकाच वेळी तब्बल १८ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या ऑपरेशनमुळे केवळ पुणेच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आणि देशभरात खळबळ उडाली आहे.

संशयितांची चौकशी सुरू
या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना एटीएसच्या ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, कारवाई अद्याप सुरू असल्याने अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी एवढंच स्पष्ट केलं की, ही कारवाई विविध सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण माहिती अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल.

कोंढवा परिसर पुन्हा रडारवर
गेल्या काही वर्षांत कोंढवा परिसरात एटीएसच्या कारवायांचे प्रमाण वाढले आहे. याच भागातून दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या एका दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा – Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

अलीकडे पुन्हा काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी मध्यरात्रीपासून ही शोधमोहीम सुरू केली. नेमके किती जणांना ताब्यात घेण्यात आलं किंवा त्यांच्याकडे काय संशयास्पद साहित्य मिळालं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीनंतर सर्व माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!