Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

D K Rao Arrested: मोठी बातमी! छोटा राजनचा साथीदार डी.के. राव याला अटक

D K Rao Arrested: मोठी बातमी! छोटा राजनचा साथीदार डी.के. राव याला अटक

D K Rao Arrested: मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा सहकारी कुख्यात गुंड रवी मल्लेश बोऱ्हा उर्फ डी.के. राव याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा अटक केली आहे. डी.के. रावला कोर्टाच्या परिसरातून अटक केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Nilesh Ghaywal : निलेश घायवळच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा; अटक टाळण्यासाठी धडपड

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण मागील वर्षीचे आहे. परंतु तक्रारदाराने अलीकडेच तक्रार दिल्यामुळे रावला अटक करण्यात आली. आरोपीने गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले, मात्र प्रकल्प पूर्ण केला नाही. पैसे मागितल्यावर, डी.के. रावचा वापर करून गुंतवणूकदारांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. धारावीचा रहिवासी डी.के. राव 1990 च्या दशकात किरकोळ चोरी आणि लूटमार करत होता. त्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला आणि छोटा राजन टोळीशी संपर्क जोडला. 1990 ते 2000 या काळात मुंबईतील जबरी वसाहती, खंडणी, मालमत्तावरील वाद यामध्ये त्याचे नाव वारंवार समोर आले.

हेही वाचा – ED ची अनिल अंबानींवर कारवाई! रिलायन्स पॉवरचे CFO अशोक पाल यांना अटक

स्वतंत्र नेटवर्क आणि गुन्हेगारी नोंदी

यानंतर डी.के. रावने स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क तयार केले, तरी छोटा राजनप्रती निष्ठा कायम ठेवली. पोलीस नोंदींनुसार, त्याच्यावर एकूण 42 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सहा खून, पाच दरोडे, आणि अनेक खंडणी प्रकरणे समाविष्ट आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!