Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

leopard attack: शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; हल्याची सातवी घटना

leopard attack: शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; हल्याची सातवी घटना

पुणे: पिंपरखेड (ता.शिरूर) येथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडे पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरा मागील शेतातजमीन नांगराणीचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून ऊसात फरपटत नेले. आजोबा अरूण देवराम यांनी हे भयावह दृश्य पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याशी दोन हात करून बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले.तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच माजी सहकारमंत्री दिलिपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.या घटनेने पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!