Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ambadas Danve : ‘आनंदाच्या शिधा’नंतर शिंदेंची आणखी एक योजना बंद?; दानव्यांनी थेट यादीच जाहीर केली

Ambadas Danve : ‘आनंदाच्या शिधा’नंतर शिंदेंची आणखी एक योजना बंद?; दानव्यांनी थेट यादीच जाहीर केली

मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेचीही अंमलबजावणी थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसह ‘आनंदाच्या शिधा’नंतर शिक्षण विभागातील इतर अनेक निर्णयही मागे घेण्यात आले आहेत.

एकाच शैक्षणिक वर्षात राबविलेल्या या योजनेची नोव्हेंबर २०२४ नंतर पुढील कार्यवाही झालेली नाही, ज्यामुळे ती बंद झाल्याची चर्चा आहे. या योजनांमुळे लाखो रुपयांची पारितोषिके वाटप करण्यात आली होती, पण आता देवेंद्र फडणवीस सरकारमुळे त्या रद्द झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण व सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत २०२३-२४ शैक्षणिक वर्षात राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर करून शाळांना प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला. दोन टप्प्यांत ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात आली, ज्यात शाळांच्या स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञानाचा वापर व शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा यांचा समावेश होता.

मात्र, २०२४-२५ शैक्षणिक वर्षात या योजनेची सुरुवात झालेली नाही. याशिवाय, शिक्षण विभागातील ‘स्वच्छता मॉनिटर’, ‘एक राज्य एक गणवेश’ व ‘पुस्तकाला वह्यांची पान’सारखे निर्णयही रद्द करण्यात आले आहेत. विरोधकांच्या मते, हे फडणवीस सरकारचे शिंदे यांच्या निर्णयांना धक्का देण्याचे प्रयत्न आहेत.

दानव्यांचा एक्सवरून जोरदार टोला

शिवसेना (ठाकरे गट) नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या योजनांच्या बंदीवरून फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटले, सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, असं दानवे यांनी म्हटले आहे.

बंद झालेल्या योजनांची यादी

१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!

योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असा इशाराही दानवे यांनी दिला. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!