आपण जास्त वर्षे जगावं असं सर्वांनाच वाटतं असतं. पण, जीवनशैलीत काही बदल केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. आहार आणि व्यायाम यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. योग्य आहारामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सकाळी लवकर उठल्याने लक्ष केंद्रित करणे, सर्जनशीलता आणि स्मरणशक्ती सुधारते. लवकर उठल्याने शांत मनाने आणि सकारात्मक उर्जेने दिवसाची सुरुवात करता येते. तुम्ही तुमचा दिवस कसा सुरू करता याचा तुमच्या मनःस्थिती, उर्जेवर आणि सर्जनशीलतेवर परिणाम होतोच, शिवाय, दिवसभर तुम्ही किती लक्ष केंद्रित, उत्पादक आणि सकारात्मक आहात हे देखील ठरवते. फक्त १५ मिनिटे फिरणे आणि जिममध्ये एक तास व्यायाम करणे फायद्याचे ठरते. ज्यामध्ये कार्डिओ आणि प्रतिकार प्रशिक्षण दोन्ही समाविष्ट आहे.
निरोगी शरीरासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. नाश्त्यात ६० ग्रॅम प्रथिने असावीत. तो अनेकदा व्हे प्रोटीन, अक्रोड आणि बेरी मिसळलेले स्वाद नसलेले ग्रीक दही खातो. यामुळे तो जास्त काळ पोटभर राहतो आणि दिवसभर त्याला ऊर्जावान वाटतो. त्यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


