Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिवाळी स्वच्छता मोहिमेत पुणेकरांचा सहभाग; 4 दिवसांत PMC ने गोळा केला तब्बल २,६०० मेट्रिक टन कचरा!

दिवाळी स्वच्छता मोहिमेत पुणेकरांचा सहभाग; 4 दिवसांत PMC ने गोळा केला तब्बल २,६०० मेट्रिक टन कचरा!

पुणे: दिवाळीच्या उत्सवातनंतर पुणे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. फटाके, फुलबाजार, पूजा साहित्य आणि सणासुदीच्या खरेदीमुळे या काळात शहरात दररोजच्या तुलनेत अधिक कचरा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने (PMC) विशेष स्वच्छता मोहीम राबवून दिवाळीदरम्यान सरासरी २,६०० मेट्रिक टन कचरा दररोज गोळा केला.

सामान्य दिवसांमध्ये पुण्यात दररोज सुमारे २,४०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र दिवाळीत हे प्रमाण जवळपास १५० टनांनी वाढले. ऑनलाइन ऑर्डर्स, पॅकेजिंग बॉक्स, फटाके, तसेच बाजारपेठांमधील तात्पुरत्या स्टॉलमुळे कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले. शहरातील विविध भागांमध्ये पूजा साहित्य, फुलांचे अवशेष आणि फटाक्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार
१३ ऑक्टोबर : २,७३४.२ मेट्रिक टन
१४ ऑक्टोबर : २,७४२.३ मेट्रिक टन
१५ ऑक्टोबर : २,६६६.६९ मेट्रिक टन
१६ ऑक्टोबर : २,५७४.४४ मेट्रिक टन

या चार दिवसांत सरासरी २,६०० मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. PMC च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, दिवाळीच्या काळात बाजारपेठा आणि निवासी भाग दोन्हीकडे कचऱ्याचे प्रमाण वाढले. या वाढीला तोंड देण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली. नियमित २,४०० टनांच्या तुलनेत या काळात दररोज सरासरी २,६०० टन कचरा गोळा करण्यात आला, म्हणजेच सुमारे १५० टनांची वाढ झाली.

शहरातील स्वच्छता राखण्यासाठी PMC ने अतिरिक्त गाड्या, मजूर आणि शिफ्ट्स वाढवून कामकाज सुरळीत ठेवले. नागरिकांनीही स्वच्छतेत सहकार्य करत दिवाळीचे दिवस कचरा मुक्त करण्यास मदत केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!