Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jaipur Bus Fire: जयपूरमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; 12 जण होरपळले, 3 जणांचा मृत्यू

Jaipur Bus Fire: जयपूरमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; 12 जण होरपळले, 3 जणांचा मृत्यू

Jaipur Bus Fire: राजस्थानच्या जयपूरजवळ मनोहरपूर परिसरात गुरुवारी सकाळी भीषण बस अपघात घडला. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी एक खाजगी बस हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्याने क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर भाजले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वीजेच्या संपर्कात आल्याने बस पेटली

घटनेची प्राथमिक माहिती अशी की, शाहपुरातील तोडी गावातील वीटभट्टीवर काम करणारे कामगार या बसने प्रवास करत होते. जयपूरपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहरपूर परिसरात बस हाय-टेन्शन लाईनला स्पर्श झाली आणि क्षणात वीज प्रवाह बसमध्ये पसरला. काही क्षणांत बसला आग लागली. परिस्थिती अधिक भयानक झाली कारण बसमध्ये ५ ते ६ गॅस सिलिंडर साठवलेले होते, जे स्फोटक ठरले.

मृतांमध्ये वडील-मुलीचा समावेश

या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये ५० वर्षीय नसीम आणि त्यांची २० वर्षीय मुलगी शाहीन यांचा समावेश आहे. तिसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना जयपूर आणि मनोहरपूर येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून तत्काळ मदत; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे निर्देश

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘जयपूरमधील मनोहरपूर येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.’ तथापी, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, तपासासाठी तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!