Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फळं, पालेभाज्यांच्या माध्यमातून हृदय ठेवता येऊ शकतं निरोगी; जीवनशैलीतील असंतुलन ठरतं धोकादायक…

फळं, पालेभाज्यांच्या माध्यमातून हृदय ठेवता येऊ शकतं निरोगी; जीवनशैलीतील असंतुलन ठरतं धोकादायक…

सध्या जीवनशैलीत चांगला बदल होत आहे. या स्पर्धेच्या युगात स्वत:कडे दुर्लक्ष करणं अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतं. त्यात आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. फळं, पालेभाज्यांच्या माध्यमातून हृदय निरोगी ठेवता येऊ शकतं. मात्र, हे करत असताना जीवनशैलीतील असंतुलन धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे.

जास्त मीठ, जंक फूड, तळलेले पदार्थ किंवा साखरेचे पेये हळूहळू आपल्या हृदयाच्या धमन्या ब्लॉक करतात. दुसरीकडे, काही पदार्थ हृदयाला बळकटी देतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहार घेतल्याने हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. तुमच्या आहारात सुधारणा केल्याने हा धोका कमी करता येऊ शकतो. फळे आणि भाज्यांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर तुमच्या धमन्या स्वच्छ ठेवतात.

आक्रोड आणि बदाम यांसारख्या काजूमधील चांगले फॅट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे, ओमेगा-३ पदार्थ तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करतात. अनेक शाकाहारी पदार्थ हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आत्ताच तुमच्या आहारात हे समाविष्ट करा.

धूम्रपान, मद्यपान ठरू शकतं धोकादायक

धावपळीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे या महत्त्वाच्या अवयवाला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. निरोगी हृदय राखण्यासाठी तुमचा आहार सुधारणे आवश्यक आहे. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेले अन्न हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!