Pune: हडपसमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. विक्रीसाठी आणलेला 3 लाखाचा मेफेड्रोन हडपसरमधून जप्त केला आहे.या कारवाईत पथकाने तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली. मंगळवारी दिनांक 28 तारखेला ही कारवाई पार पडली.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शहरातील हडपसर, वानवडी, काळेपडळ भागात पेट्रोलींग करत असताना मांजरी ते 15 नंबर चौक रोड इंण्डेन गॅस शेजारीपार्कींगजवळ दुचाकीवर एक महिला व एक तृतीयपंथी हे संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपी ससमोर आले.
मेघा दिपक जगताप (वय 27, राहणार मांजरी रोड, हडपसर, पुणे), स्नेहल उर्फ गणेश शिवसांब बाचे (वय 21 वर्षे रा. पॅराटाइज सोसायटी, काळुबाई लेन नंबर 1, ससाणेनगर रोड, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. कारवाईत त्यांच्या अंगझडती आणि घरझडती दरम्यान सुमारे 3,00,400 रुपये किंमतीचा सुमार 60 ग्रॅम 08 मिली वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याशिवाय वजन काटा, 2 मोबाईल व टीव्हीएस ज्युपीटर गाडी असा एकुण 4,31,950 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून ताब्यात घेतला आहे.


