पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत ८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना गुरुवारी, १ आणि २ ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा लागणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेची चौथ्या नियमित फेरीतील प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून बुधवार, ३० रोजी जाहीर करण्यात आले. यापूर्वी नियमित तीन फेऱ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. चौथ्या फेरीत ८३,९४४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. यामध्ये विज्ञान शाखेतील ४ हजार २२२, कला शाखेतील १५ हजार ६६९ आणि वाणिज्य शाखेतील २६ हजार ५३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी पुढील तीन दिवसांत प्रवेश निश्चित करायचा आहे. राज्यातील ९,५२२ कनिष्ठ महाविद्यालयातील २१,४३,६१० जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये मिळून एकूण ८,११,७३१ विद्याध्यर्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे.


