Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पार्टीच्या कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पार्टीच्या कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पुणेः खराडी येथील पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याची संपूर्ण कारवाई संशयास्पद असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे कोणी व्हायरल केली, याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शप गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली.

या पार्टी प्रकरणामध्ये खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. या पार्टीमध्ये सुमारे ४२ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मात्र, डॉ. खेवलकर यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी हेतुपुरस्सर ही कारवाई केली असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री शहर गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेऊन निःस्पृहपणे तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. डॉ. खेवलकर यांची व अन्य आरोपींची ओळख नव्याने झाली. पार्टीमध्ये उपस्थित असलेले दोनजण अनाहत होते. तसेच, तेथे आलेल्या दोन तरुणींचा पार्टीतील सहभाग अत्यंत संशयास्पद आहे. या तरुणींना अन्य कोणीतरी तेथे पाठवले होते व त्या आल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी तपासणी करण्यापूर्वीच या तरुणींनी पर्समधील अमली पदार्थ काढून पोलिसांकडे देणे, हे संशयास्पद आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!