पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील ‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’, पुणे येथे यंग प्रोफेशनल -II (YP-II) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
त्यासाठी प्रकल्प प्रमुख (डॉ. एस. डी. रामटेके), आयसीएआर- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर द्राक्षे, पी.बी. क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- ४१२३०७ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : यंग प्रोफेशनल -II (YP-II)
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 42000/-
– वयोमर्यादा : 21 वर्षे ते 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


