मुंबई : अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपटसृष्टीत एक काळ होता. मात्र, आता वयाच्या 75 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये सतत सक्रिय असताना ते दिसत आहेत. मिथुन चक्रवर्ती हे लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘बंगाल फाईल्स’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर एक असा चित्रपट आहे, त्यामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे एकत्र दिसणार आहेत.
मिथुन चक्रवर्ती आणि सुपरस्टार रजनीकांत हे दोघेही प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व आहे. ‘जेलर 2’ या चित्रपटात हे दोन्ही अभिनेते आपल्याला दिसणार आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना चित्रपटाबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी रजनीकांतबरोबर ‘जेलर 2’ हा चित्रपट करत आहे का? तेव्हा अभिनेत्याचे उत्तर होय होते.
रजनीकांत यांच्याशी त्याच्या मैत्रीबद्दल आणि संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले, “माझी आणि रजनीची मैत्री खूप जुनी आहे. आम्ही वेगवेगळ्या भाषा आणि उद्योगातून आलो आहोत. परंतु नेहमीच मनापासून जोडलेले आहोत. अलीकडेच आम्ही एका कार्यक्रमात भेटलो. आता आम्ही एका चित्रपटातही एकत्र दिसणार आहोत”.
30 वर्षांनंतर दिसणार एकत्र
रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती सुमारे 30 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. 1995 च्या बंगाली चित्रपटात हे दोघेही अखेरचे दिसले होते. यापूर्वी मिथुन आणि रजनीकांत 1989 च्या हिंदी चित्रपटाच्या ‘भ्रष्टाचार’ मध्ये एकत्र दिसले. या दोघांव्यतिरिक्त, रेखा, अनुपम खेर आणि रझा मुरादसुद्धा रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत. आता सुमारे 30 वर्षांनंतर, दोघे पुन्हा ‘जेलर 2’ मध्ये एकत्र दिसतील.


