पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे.
आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर येथे यंग प्रोफेशनल-I या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ccri.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-I.
⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नागपूर.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: १७ फेब्रुवारी २०२६.
⇒ मुलाखतीची पत्ता: आयसीएआर- सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, एनबीएसएस आणि एलयूपी समोर आणि रीजनल रिमोट सेन्सिंग सेंटर, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.


