Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ए. आर. रहमान कपिल शर्माच्या शोमध्ये; लता मंगेशकर यांची शपथ घेतली अन् म्हणाला…

ए. आर. रहमान कपिल शर्माच्या शोमध्ये; लता मंगेशकर यांची शपथ घेतली अन् म्हणाला…

मुंबई : चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असलेले ए. आर. रहमान सध्या वादात अडकले आहेत. त्यांनी ‘छावा’ला ‘विभाजनकारी चित्रपट’ म्हटले आणि बॉलीवूडमध्ये जातीयवाद असल्याचा दावा केला. रहमान यांच्या या विधानानंतर सोशल मीडियासह बॉलीवूडमध्ये वाद निर्माण झाला.

आता, त्यांच्या विधानानंतर काही दिवसांनी, रहमान नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे. कॉमेडी स्टार कपिल शर्माच्या शोचा हा भाग ३१ जानेवारीला प्रसिद्ध जाला. या शोचा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यात, होस्ट कपिल शर्मा रहमानची गंमत करताना दिसत आहे. कपिल संगीत दिग्दर्शकाची एका शब्दात उत्तरे दिल्याबद्दल त्याची खिल्ली उडवतो. त्याच्यासोबत शोमध्ये ‘गांधी टॉक्स’ या मूकपटाचे कलाकार सामील झाले आहेत. नेटफ्लिक्सच्या प्रोमोमध्ये कपिल अभिनेत्री अदिती राव हैदरी, विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव आणि रहमान यांचे शोमध्ये स्वागत करताना दिसून आला.

कपिल कॉमेडी करताना संगीतकार रहमानला लता मंगेशकर यांच्या गाण्यांची सीडी हाताने घेण्यास सांगतो. त्यानंतर मला वचन द्या की जर मी तुम्हाला एका ओळीचा प्रश्न विचारला तर तुम्ही एकाच ओळीत उत्तर द्याल. कारण जेव्हा तुम्ही रहमानला चार ओळींचा प्रश्न विचारता तेव्हा ते नेहमीच एका शब्दात उत्तर देतात. हो, नाही, खूप चांगले, असे म्हणत कॉमेडी सुरु केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!