पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, नंदुरबार येथे पीजीटी-इंग्रजी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नंदुरबार येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 35750 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पीजीटी-इंग्रजी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नंदुरबार
– वेतन / मानधन : दरमहा 35750 रुपये
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ५ जानेवारी २०२६
– मुलाखतीचा पत्ता : पी.एम. श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा, जिल्हा-नंदुरबार-425415, महाराष्ट्र.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://navodaya.gov.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


