Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे मिळू शकते नोकरी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे मिळू शकते नोकरी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रकल्प समन्वयक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 75000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी मा. प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक- ४२२००२ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://nrhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!