पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’, नागपूर येथे वरिष्ठ व्यवस्थापक (कार्यकारी शिक्षण) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.iimnagpur.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक – कार्यकारी शिक्षण.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : ५० वर्षांपर्यंत
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जानेवारी २०२६.


