पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील एका विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
कविकुलागुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर येथे असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही दिनांक 08 जानेवारी 2026 रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय, रामटेक, प्रशासकीय इमारत, मौदा रोड, रामटेक, जिल्हा-नागपूर – 441106 येथे घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : असिस्टंट प्रोफेसर.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 08 जानेवारी 2026.
– मुलाखतीचा पत्ता : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय, रामटेक, प्रशासकीय इमारत, मौदा रोड, रामटेक, जिल्हा-नागपूर – 441106.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kksu.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


