पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नवी मुंबई महानगरपालिका येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका येथे गट ‘अ’ श्रेणी {वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत 113 रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला १७७५०० पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


