पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पंढरपूर अर्बन बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि. सोलापूर येथे शाखा व्यवस्थापक आणि वसुली व्यवस्थापक (कायदेशीर) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, आणि सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक आणि वसुली व्यवस्थापक (कायदेशीर).
– वयोमर्यादा : शाखा व्यवस्थापक: किमान ३५ वर्षे आणि वसुली व्यवस्थापक (कायदेशीर): किमान ४० वर्षे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजी नगर, आणि सातारा.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 30 जानेवारी 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2026.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : माननीय अध्यक्ष, पंढरपूर अर्बन को-ऑप बँक, 4163 ब, प्रशासकीय इमारत, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर 413304.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : recruitmentpucb@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pandharpurbank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


