पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नवी मुंबई येथील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई येथे वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : तळोजा, नवी मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 52,080/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जानेवारी २०२६.


