पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल होल्डिंग कंपनी येथे संचालक (इंधन), संचालक (प्रकल्प) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ६० वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १९ मे २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.msebindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संचालक (इंधन), संचालक (प्रकल्प).
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वयोमर्यादा : 60 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ मे २०२६.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१.


