पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोली येथे पीजीटी रसायनशास्त्र या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही ४ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे. यासाठी मुख्याध्यापक कार्यालय, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बासमथनगर, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र-431512 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पीजीटी रसायनशास्त्र.
– नोकरीचे ठिकाण : बसमतनगर, जि. हिंगोली.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०४ फेब्रुवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : मुख्याध्यापक कार्यालय, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बासमथनगर, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र पिन -431512.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://navodaya.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


