Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Good News ! रेल्वेत मिळू शकते नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

Good News ! रेल्वेत मिळू शकते नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, रेल्वे विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पश्चिम रेल्वे, मुंबई येथे वैद्यकीय व्यवसायी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही २० फेब्रुवारी २०२६ घेतली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वैद्यकीय व्यवसायी.
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : २० फेब्रुवारी २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : सीएमएस कार्यालय, पश्चिम रेल्वे, डीआरएम इमारत, तळमजला, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी wr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!