Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथे मिळू शकते नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Job Alert ! व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथे मिळू शकते नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथे वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बदनापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

सदर मुलाखत ही प्रभारी अधिकारी, व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना (महाराष्ट्र) – ४३१२०२ येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.vnmkv.ac.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल सहाय्यक

– एकूण रिक्त पदे : 05 पदे.

– नोकरीचे ठिकाण : बदनापूर, जि- जालना.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 10,000 /- ते रु. 37,000/- पर्यंत.

– निवड प्रक्रिया : मुलाखत.

– मुलाखतीची तारीख : ०६ जून २०२६.

– मुलाखतीचा पत्ता : प्रभारी अधिकारी, व्हीएनएमकेव्ही कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना (महाराष्ट्र) – ४३१२०२

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!