Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील ‘या’ मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुण्यातील ‘या’ मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे रिसर्च असोसिएट (आरए), सीनियर रिसर्च फेलो (एसआरएफ), ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) आणि प्रोजेक्ट असिस्टंट (पीए) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत पाच रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे.

संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : रिसर्च असोसिएट (आरए), सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ), ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) आणि प्रोजेक्ट असिस्टंट (पीए).

– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे

– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु. 67,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल).

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!