पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 रुपयांपर्यंत मिळू शकतो.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ऑफिस असिस्टंट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट.
– एकूण रिक्त पदे: 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर.
– वेतन/ मानधन : रु. 20,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 22 – 40 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, अहिल्यानगर. प्लॉट क्रमांक पी/५६, एमआयडीसी, नव नागापूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र पिन ४१४१११.
.- या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


