Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, घरबसल्या करता येणार अर्ज…

Job Alert ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे नोकरीची संधी; पगारही चांगला, घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत).

⇒ एकूण रिक्त पदे : 14 पदे

⇒ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. 33,630/- ते रु. 45,000/- पर्यंत.

⇒ वयोमर्यादा : ६४ वर्षांपर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन (स्पीड पोस्टने).

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2025.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक (स्वतंत्र कार्यभार), स्थापना शाखा-II, ESI कॉर्पोरेशन, प्रादेशिक कार्यालय, ५ वा मजला, MGH हॉस्पिटल, डॉ. एस.एस. राव रोड, परळ (पूर्व), मुंबई-४०००१२.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/
या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!