Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! IDBI बँकेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, जाणून घ्या भरती प्रक्रिया…

Bank Job ! IDBI बँकेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज, जाणून घ्या भरती प्रक्रिया…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, IDBI येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड येथे उप-महाव्यवस्थापक – श्रेणी D, सहाय्यक महाव्यवस्थापक – श्रेणी C, व्यवस्थापक – श्रेणी B, कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – सुरक्षा अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : उप-महाव्यवस्थापक – श्रेणी D, सहाय्यक महाव्यवस्थापक – श्रेणी C, व्यवस्थापक – श्रेणी B, कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – सुरक्षा अधिकारी

– एकूण रिक्त पदे : 33 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ एप्रिल २०२६

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://idbibank.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!