पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँक लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.
जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँक लिमिटेड येथे मुख्य कार्यकाही अधिकारी, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य कार्यकाही अधिकारी, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे
– नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज शुल्क : रु.५००/- डिमांड ड्राफ्ट.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँक लि., अमरावती, जिजाऊ’ प्लॉट क्र.३३ व ३४, वालकट कंपाऊंड, अमरावती.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://jijaubank.org.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


