सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत. इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, याने इराणमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात एक्स पॉर्न स्टार मिया खलिफाने लेबनॉनमधील वाढत्या हिंसाचारावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तिने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
मियाने तेथील परिस्थिती भयावह आणि अस्वस्थ करणारी असल्याचे वर्णन केले आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही हे हल्ले आमच्या डोळ्यांनी पाहिले आहेत, असे म्हणताना तिला रडू कोसळले. तिने याचा थेट संबंध दहशतवादाशी जोडला. मियाने आपली असहाय्यता व्यक्त करणारा एक व्हिडिओ शेअर केला. बोलताना ती खूप भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू स्पष्ट दिसत होते. व्हिडिओ पोस्ट करताना मियाने कॅप्शन दिले, “हे दोन देशांनी केलेल्या दहशतवादापेक्षा कमी नाही, ज्यांचे युद्धगुन्हे एकमेकांशी स्पर्धा करतात. अमेरिका आणि इस्रायल हे दहशतवादी आणि फॅसिस्ट देश आहेत आणि एक दिवस, हेगमध्ये (आंतरराष्ट्रीय खटल्यांचे केंद्र) त्या दोघांवर खटले चालवले जातील.”
दरम्यान, या हल्ल्यांची तीव्रता वर्णन करताना मिया खलिफा म्हणाली की, केवळ १० मिनिटांत सुमारे १६० हवाई हल्ल्यांचे अहवाल समोर आले आहेत. या हल्ल्यांचा केवळ लष्करी तळांवरच नव्हे, तर नागरिकांची घरे, शाळा आणि रुग्णालयांवरही गंभीर परिणाम झाला. स्मशानभूमी आणि अंत्यविधीसारखी ठिकाणेही सुटली नाहीत, ज्यामुळे गंभीर परिस्थिती समोर येत आहे. त्यामुळे हे युद्ध लवकर संपावे, असे तिने म्हटले आहे.


