पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, केंद्रीय विद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार आहे.
केंद्रीय विद्यालय, नांदेड येथे एटीएल प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक (खो-खो, बास्केट बॉल, कबड्डी आणि टेबल टेनिस), कराटे प्रशिक्षक, पीजीटी-जीवशास्त्र (केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ मुदखेडसाठी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २६ सप्टेंबर रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार असल्याने त्यासाठी केंद्रीय विद्यालय SCR नांदेड. डीआरएम कॅम्पस, गेट नंबर 4, एअरपोर्ट रोड, पो. तरोडा, नांदेड- 431605 (महाराष्ट्र) येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://scrnanded.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


