आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण, काही आजार हे बळावतातच. त्यात यकृत कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. अनेक औषधे आणि उपचार अस्तित्वात उपलब्ध आहेत. अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठातील संशोधकांनी पेरूच्या वनस्पतींपासून मिळवलेल्या विशिष्ट रेणूंचा वापर करून यकृत कर्करोगावर उपचार करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.
यकृत कर्करोगाचा उपचार सोपा आणि परवडणारा बनू शकतो. हा शोध अशा देशांसाठी आशा निर्माण करतो जिथे महागड्या कर्करोगाच्या उपचार सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत. पण, निसर्गात अशी एक गोष्ट आहे ती या कर्करोगावर प्रभावी ठरू शकते. पेरू हे फळ फायद्याचे आहे. या साध्या फळाच्या पानांनी अशा धोकादायक आजारावर उपचार मिळवता येतो. निसर्गात हजारो वनस्पती आहेत, ज्यांचा वापर हजारो वर्षांपासून सर्वात गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे.
विलो झाडाच्या सालीपासून बनवलेल्या सॅलिसिनपासून अॅस्पिरिनचे उत्पादन हे एक उत्तम उदाहरण आहे. अनेक वनस्पतींमध्ये विविध रोगांवर उपचार करणारी संयुगे असतात.
पेरूचे झाड ठरते वरदान
एका विद्यापीठाच्या पथकाने प्रयोगशाळेत पेरूचे रेणू तयार करण्यासाठी सहज उपलब्ध असलेल्या रसायनांचा वापर केला. यामुळे मोठ्या प्रमाणात औषध उत्पादन शक्य होईल आणि रुग्णांना परवडणारी उपलब्धता मिळेल, असे दिसून आले.


