पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, अमरावतीत एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी येथे वैद्यकीय अधिकारी (गट-अ) आणि वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती, अकोला, नांदगावपेठ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी वैद्यकीय प्रशासन अधिकारी, कार्यालय महा-राकावि सोसायटी (महाराष्ट्र शासन) C/O. मुकेश शिरभाते, दुसरा माळा, मोतिनगर, अमरावती ४०० ६०६ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


