Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai crime : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर छळाचा आरोप

Mumbai crime : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर छळाचा आरोप

Mumbai crime : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून, भाजपच्या नेते आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा वैयक्तिक सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या लग्नाच्या अवघ्या नऊ महिन्यांतच या डॉक्टराने वरळीतील राहत्या घरी सायंकाळी सात वाजता गळफास घेत जीवन संपवले. कौटुंबिक वाद आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे ही घटना घडली असल्याचा प्राथमिक संशय आहे.

डॉ. गौरी पालवे (वय २८) या केईएम रुग्णालयातील डेटिस विभागात कार्यरत होत्या आणि वरळी बीडीडी येथे अनंत गर्जे यांच्यासोबत राहत होत्या. लग्नाच्या वेळी स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मात्र, लग्नानंतर अनंत गर्जे यांचे अफेअर असल्याने गौरी अस्वस्थ झाल्या असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. याशिवाय, सासरच्या बाजूने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

शनिवार (२२ नोव्हेंबर) रात्री ही घटना घडल्यानंतर वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर आत्महत्या कारण स्पष्ट होईल. कुटुंबीयांची आणि अनंत गर्जे यांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे पंकजा मुंडे यांनी बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक कलह आणि मानसिक ताण यांच्या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढत असल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!