Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dhule Crime : चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, महाराष्ट्र हळहळला

Dhule Crime : चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, महाराष्ट्र हळहळला

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अमानुष्यतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयावरून दोन इसमांनी १४ वर्षीय अल्पवयीन हिमांशू या मुलाचे अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधले आणि खाली आग पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या क्रूर मारहाणीने आणि चटक्यांनी हिमांशू गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना शिरपूर जळोद रस्त्यालगत भामपूर शिवारातील वीटभट्टी जवळ घडली. आरोपी चिंतामण उर्फ चिंटू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी (दोघे भामपूरचे) यांनी हिमांशूला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि शेतात नेले. तेथे त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून अमानुष मारहाण केली. नंतर बैलगाडीखाली आग पेटवली, ज्यामुळे लोखंड तापले आणि हिमांशूच्या शरीराला भीषण चटके बसले.

हिमांशूने “ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो” असे सांगून गयावया करत आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि घरी पोहोचला. घरी येताच त्याने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली. मुलाच्या मामाने प्रसारमाध्यमांना सांगितले, “मेला तर जेसीबीने खड्डा खणून दाबून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली होती.”

हिमांशूचे वडील सातपूर (ता. शिरपूर) येथील रहिवासी असून, त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंवि ३६३ (अपहरण), ३२३, ३२५, ३०७ (जीवघेणा हल्ला), ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) तसेच बाल न्याय कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरातल्या कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!