पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर महानगरपालिका येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेत कंत्राटी निगम लेखा सल्लागार, कंत्राटी अंदाजपत्रक सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज तुम्हाला करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर मुलाखत ही 24 नोव्हेंबर 2025 रोजी अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर कार्यालय येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


