Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दुबईमध्ये शाहरुखच्या नावाने बांधला जातोय आलिशान टॉवर; अब्जावधींचा येणार खर्च…

दुबईमध्ये शाहरुखच्या नावाने बांधला जातोय आलिशान टॉवर; अब्जावधींचा येणार खर्च…

मुंबई : शाहरुख खान हा केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला सुपरस्टार किंग खानही म्हटले जाते. शाहरूखची लोकप्रियता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आहे. अरब देशांमधील लोक त्याच्या चित्रपटांवर प्रभावित आहेत. आता, शाहरुखच्या नावावर दुबईमध्ये एक आलिशान टॉवर बांधला जाणार आहे, ज्याचा खर्च अब्जावधी रुपयांपेक्षा जास्त आहे.

शाहरुख खान मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होता. त्याने त्याच्या नावाने बांधल्या जाणाऱ्या ‘शाहरुखचे डॅन्यूब’ या इमारतीचे उद्घाटन केले. त्याच्यासोबत इमारतीचे संस्थापक आणि अध्यक्ष रिझवान संज होते, ज्यांनी शाहरूखच्या नावाने ही भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. दुबईमध्ये शाहरुख खानची लोकप्रियता आधीच प्रचंड आहे. तिथले लोक त्याच्यावर अपार प्रेमाचा वर्षाव करतात. आता, शाहरूखने त्याच्या नावाने बांधल्या जाणाऱ्या इमारतीबद्दल आनंदही व्यक्त केला.

दरम्यान, शाहरूख याने म्हटले की, “जर माझी आई जिवंत असती तर तिला खूप आनंद झाला असता. हा खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा माझी मुले येतील तेव्हा मी त्यांना सांगेन, ‘पाहा, त्यावर बाबांचे नाव लिहिलेले आहे. ही बाबांची इमारत आहे.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!