Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकच्या ‘या’ ठिकाणी नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

नाशिकच्या ‘या’ ठिकाणी नोकरीची संधी; पगारही चांगला, लवकर करा अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नाशिक येथील एका संस्थेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सात रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 45000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, मालेगाव-४२३ २०३ जि. नाशिक येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kvskashti.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.

⇒ एकूण रिक्त पदे : 07 पदे.

⇒ नोकरी ठिकाण : काष्टी, नाशिक.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 45,000/- पर्यंत.

⇒ अर्ज शुल्क : रु. ५००/-.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२५

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विद्या संकुल, काष्टी, मालेगाव-४२३ २०३ जि. नाशिक.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!