Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेअर बाजारात तेजी; ‘ही’ प्रमुख कारणे ठरली परिणामकारक…

शेअर बाजारात तेजी; ‘ही’ प्रमुख कारणे ठरली परिणामकारक…

मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. शेअर मार्केट मंगळवारी ग्रीन झोनमध्ये उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभर स्थिरपणे व्यवहार करत होते. त्यानंतर जोरदार तेजीसह बंद झाले. व्यापारादरम्यान संरक्षण क्षेत्रातील समभागांनी तेजी दाखवली, तर ऑटो आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांनीही जोरदार तेजी दाखवली.

बीएसई सेन्सेक्स ८३९०० च्या जवळ बंद झाला, तर एनएसई निफ्टी देखील २५७०० च्या जवळ बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला, सेन्सेक्स ८३६७१.५२ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८३५३५ च्या तुलनेत वाढला आणि नंतर तो वाढून ८३९३६ च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. बीएसई सेन्सेक्स ३३५.९७ अंकांनी वाढून ८३८७१.३२ वर बंद झाला. एनएसई निफ्टीनेही त्याचे अनुकरण केल्याचे पाहिला मिळाले. ५० शेअर्सचा निर्देशांक २५६१७ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद २५५७४ पेक्षा जास्त होता आणि नंतर दिवसभरात २५७१५ वर व्यवहार करत जोरदार उडी मारल्याचे दिसून आले. अखेर तो १२०.६० अंकांनी वाढून २५६९४.९५ वर बंद झाला.

शेअर बाजारातील तेजीच्या काळात स्मॉल-कॅप श्रेणीत मंदी आली असली तरी, त्यांच्या काही कंपन्यांच्या शेअर्समुळे महत्त्वपूर्व घडामोडी झाल्याचे पाहिला मिळाले. यापैकी यात्रा शेअर (१३.५८%), झुआरीइंड शेअर (१२.५६%), एपेक्स शेअर (११.५९%), पॉलीमेड शेअर (११.०५%) आणि व्हीएम लिमिटेड शेअर (१०%) वाढून टॉप गेनर स्टॉक बनले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!