पुणे : मुंबईतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 12 सप्टेंबर, 2025 पूर्वी अर्ज करावा लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’, मुंबई येथे प्रोजेक्ट असोसिएट – I या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट – I.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा 25000 रुपये
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ सप्टेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : hrdg.nio@csir.res.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.nio.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


