पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
जवाहरलाल नेहरू ऍल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
दरम्यान, नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.jnarddc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


