पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे कायदा अधिकारी, इको-टुरिझम मॅनेजर, डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला ५०००० रुपयांपर्यंत पगारही मिळू शकणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे कार्यालय पहिला माळा, नविन प्रशासकिय इमारत (वन भवन), शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


