मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे 70 वा फिल्मफेअर अवॉर्ड इव्हेंट ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या ऐतिहासिक इव्हेंटमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत. या इव्हेंटमध्ये अक्षय कुमार देखील एक शानदार होस्ट करणार आहे.
फिल्मफेअरने मला प्रत्येक प्रकारे सन्मानित केले आहे. मी खलनायक, विनोदी कलाकार आणि इतर अनेक भूमिकांसाठी पुरस्कार जिंकले आहेत. ‘द ब्लॅक लेडी’ माझ्या कारकिर्दीची साक्षीदार आहे. प्रत्येक भूमिकेसह स्टेजवर असणे आणि फिल्मफेअरच्या ७० व्या कार्यक्रमात होस्ट करणे आनंददायक आहे. पुरस्कार सोहळ्यात मी होस्ट करण्यास सज्ज आहे, असे अक्षय कुमार याने सांगितले.
करण जोहर आणि मनीष पॉल शाहरुख खानसोबत फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन देखील करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच यापूर्वी, शाहरुख खान फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करणार असल्याचे वृत्त होते. याबाबत शाहरुख खान म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच ‘ब्लॅक लेडी’चे आयोजन केल्यापासून, गेल्या काही वर्षांत मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि चाहत्यांसोबत असंख्य आठवणी शेअर केल्या आहेत. हा प्रेम, सिनेमा आणि जादूचा प्रवास होता’.


