पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक, संशोधन इंटर्न, प्रशासकीय सह लेखा सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 50000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक, संशोधन इंटर्न, प्रशासकीय सह लेखा सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : तुळजापूर, जिल्हा – धाराशिव.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 8,000/- ते रु. 50,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ४० वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2025.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 03 ऑक्टोबर 2025.
– मुलाखतीचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर ऑफ कॅम्पस, तुळजापूर, धाराशिव महाराष्ट्र-413601.


